MDM कॅल्क्युलेटर (MDM Calculator Marathi) ॲप कसे वापरावे?
हे ॲप वापरणे खूप सोपे आहे. फक्त खालील पायऱ्या (steps) फॉलो करा :
पायरी १ : विद्यार्थी संख्या टाका
- MDM Calculator Marathi ॲप उघडल्यावर तुम्हाला ‘दैनिक नोंद’ हे पान दिसेल.
- तिथे “आज उपस्थित विद्यार्थी संख्या” असे लिहिलेल्या एका बॉक्समध्ये तुम्हाला त्या दिवसाची एकूण हजर विद्यार्थी संख्या टाकायची आहे.
पायरी २ : ‘हिशोब करा’ बटण दाबा
- विद्यार्थी संख्या टाकल्यानंतर, खाली असलेल्या निळ्या रंगाच्या “हिशोब करा” या बटणावर क्लिक करा.
पायरी ३ : हिशोब तपासा
- बटण दाबताच, खाली तुम्हाला त्या दिवशी लागणारे सर्व साहित्य (तांदूळ, डाळ, भाजीपाला इ.) आणि त्याचा एकूण अंदाजित खर्च दिसेल.
एवढेच! तुमचे काम झाले.
MDM Calculator Marathi ची सेटिंग्ज कशी बदलायची ? (गरज असल्यास)
जर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यामागे लागणारे प्रमाण (उदा. तांदूळ १०० ग्रॅम ऐवजी १२० ग्रॅम) बदलायचे असेल, तर:
तुम्ही ते आकडे बदलू शकता आणि खाली असलेल्या हिरव्या रंगाच्या “सेटिंग्ज जतन करा” बटणावर क्लिक करून सेव्ह करू शकता.
वरती असलेल्या “सेटिंग्ज” या टॅबवर क्लिक करा.
तिथे तुम्हाला प्रत्येक पदार्थाचे आणि खर्चाचे प्रमाण दिसेल.
शालेय पोषण आहार
तुमच्या शाळेसाठी दैनिक नियोजन