100+ आजचा सुविचार मराठी | Best Motivational Marathi Suvichar

सुविचार मराठी | Suvichar किंवा Motivational Quotes हे शालेय जीवनावर सकारात्मक परिणाम करतात. मराठी सुविचार विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. ते विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्यास आणि ते साध्य करण्यास प्रवृत्त करतात.

Motivational Marathi Suvichar | मराठी छोटे सुविचार विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची जाणीव करून देतात. ते विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि जबाबदारी यांसारख्या गुणांचे महत्त्व शिकवतात.

आजचा सुविचार मराठी, छोटे सुविचार

शालेय परिपाठासाठी आजचा सुविचार मराठी

  • पराक्रमाचा अभिमान असावा, पण उन्माद नसावा. – वि.स. खांडेकर
  • अहंकार हा तप:साधनेचा महान शत्रू आहे. – गुरुदेव रानडे
  • प्रार्थना हाच अहंकार नाशावर उपाय आहे. – महात्मा गांधी
  • यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि जिद्द आवश्यक आहे.
  • चांगले विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन जीवनात यश मिळवण्यास मदत करतात.
  • अभिमानाने अलग रहाल तर मराल. – साने गुरुजी
  • खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात असतो. – स्वामी रामतीर्थ
  • आनंदी वृत्ती आणि समाधान हि फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.
  • प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे.
  • प्रसन्न वृत्ती असणार्याची बुद्धी लवकर स्थिर होत असते.
  • आनंदी मनुष्य दीर्घायुषी असतो. – शेक्सपिअर
  • प्रसन्नता हि आत्म्याची शक्ती आहे.
  • कोणताही भार आनंदाने उचलला कि तो हलका होतो.
  • आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. – गौतम बुद्ध
  • आळसात सुरवातीस सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो.
  • ईश्वर एकच आहे; परंतु ईश्वराचे भक्त त्याचे वेगवेगळे वर्णन करतात.

More Daily Marathi motivational quotes | Suvichar in Marathi

Motivational quotes for work | काम या विषयावर मराठी सुविचार

  • कला म्हणजे सत्याचा शृंगार होय.
  • खरी कला हि आत्म्याचा अविष्कार असते.
  • सर्व कलांमध्ये ‘जीवन जगण्याची कला’ हीच श्रेष्ठ कला आहे.
  • कवी आत्म्याचा चित्रकार आहे.
  • शब्द कवीला अमर करतात, तर कवी शब्दांना भाग्यवान बनवतो.
  • अनिवार्य भावनेचा सहजस्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य.
  • मोठमोठी कामे केवळ ताकदीने होत नाहीत, तर ती सहनशक्तीने होतात.
  • प्रत्येक चांगले कार्य सुरु करण्यापूर्वी ते असंभव वाटते.
  • अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतेही काम केलेले बरे.
  • कामाचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.
  • तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे कोणतेही काम करू नका.
  • मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य होते.
  • कीर्ती म्हणजे कधीही न शमणारी तृषा आहे.
  • कीर्ती येते तेव्हा स्मृती अदृश्य होते.
  • मरावे परी कीर्तीरूपी उरावे.
  • यश त्यागाने प्राप्त होते , दगाबाजीने नाही.
  • दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करणे हीच खरी कीर्ती आहे.
  • राग हि दुर्बलतेची निशाणी आहे.
  • रागाच्या सिंहासनावर बसताच, बुद्धी तेथून निघून जाते.
  • रागाची सुरवात मूर्ख पणापासून सुरु होते व पश्चातापात संपते.
  • निसर्गामध्ये राग हि एकमेव गोष्ट आहे जी माणसाला पशु बनवते.
  • गरीबीचे प्रदर्शन करणे हे गरीबीचे दु:ख भोगण्यापेक्षा अधिक कष्टदायक आहे.
  • गरिबी हि नम्रतेची परीक्षा व मित्रतेची कसोटी असते.
  • दारिद्रय हा दुर्गुण नव्हे, ती गैरसोय किंवा अडचण आहे.
  • गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे.
  • मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.
  • सुंदर चारित्र्य हि सर्व कलांमध्ये सर्वात सुंदर कला आहे.
  • प्रतिभा हि चारित्र्याची दासी आहे.
  • चिंता जीवनाचा शत्रू आहे.
  • चिंता हि मधमाशीसारखी असते, तिला जितका दूर करण्याचा प्रयत्न कराल तितकी ती अधिक चिकटून बसते.
  • भविष्यकाळाची चिंता करणे सोडून द्या, त्यामुळे कोणतीही कार्यसिद्धी होत नाही.
  • चिंता हाच मनुष्यप्राण्याचा ज्वर असतो.
  • चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.
  • आजच्या सूर्याला उद्या येणाऱ्या ढगाआड लपवणे याचेच नाव चिंता होय.
  • जीवन म्हणजे प्रेम आणि श्रमरूपी सरितांचा संगम होय.
  • जीवन म्हणजे एक पुष्प आहे आणि प्रेम हा त्या पुष्पाचा सुगंध होय.
  • निरुपयोगी जीवन म्हणजे अकाली मृत्यू होय.
  • मनुष्य हा कसा मरतो ते महत्वाचे नाही, पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्वाचे आहे.
  • दयाशील अंतकरण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग होय.
  • दया हाच मानवाचा धर्म आहे.
  • दया म्हणजे सज्जनतेची मुलभूत निशाणी आहे.
  • दुसर्याचे दु:ख स्वत:चे समजणे याचेच नाव दया.
  • दया म्हणजे सुखाची वेल आहे.
  • दु:ख भोगल्याने सुखाची किंमत समजते.
  • जयाअंगी मोठेपण तया यातना कठीण.
  • मनुष्य मोठा विचित्र आहे, तो सुख घटाघटा पितो व दु:ख चघळीत बसतो.
  • हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे, पण एक दोष दूर करणे कठीण आहे.
  • स्वत:च्या दोषाचे भान नसणे, हाच आपला सर्वात मोठा दोष आहे.
  • नाव ठेवणे सोपे आहे, पण नाव कमावणे कठीण आहे.
  • स्वत: केलेय कामात दोष असूच शकत नाहीत, असे म्हणणारी व्यक्ती कोणतेच कार्य करू शकत नाही.
  • धनाची लालसा मनुष्याला पशु बनविते.

Leave a Comment